Bhogave Beach | सिंधुदुर्गातील भोगवे समुद्रकिनाऱ्याला 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र' | ABP Majha

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.. कारण वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे 'ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र' दिलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ''पर्यावरण अभ्यास संस्था डेन्मार्क'' या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला. यात देशातील देशातील 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली. आणि यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्गच्या भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola