BJP : ST संपावर तोडगा काढा, अन्यथा सभागृह चालू देणार नाही, भाजपचं सरकारला आव्हान
Continues below advertisement
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार की नाही याबाबत सरकार आज उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट करणार आहे. त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारनं उच्च न्यायालयात आधीच सादर केला होता. या समितीनं एसटीच्या विलिनीकरणाविरोधात मत नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. आज राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह जनतेचंही लक्ष लागलंय. दुसरीकडे विरोधकही या मुद्यावर आक्रमक झालेत. एसटी संपावर तोडगा निघाला नाही तर सभागृह चालू न देण्याचा इशारा भाजपनं दिला आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेले पाच महिने संपावर आहेत. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प आहे.
Continues below advertisement