BJP Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी

Continues below advertisement

BJP Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी,  150 मतदारसंघांमधील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार  विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून 150 जागांवर तयारी   - 150 मतदारसंघांमधील उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या निरीक्षक पाठवले जाणार   - कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवली जाणार  - प्रत्येक मतदारसंघात किती जण निवडणूक लढविण्यासाठी सक्षम आहेत ? याची चाचपणी केली जाणार  - संभाव्य उमेदवारांची नावे,  आणि इच्छूकांची माहिती घेण्याचा प्रयत्न 

हेही वाचा : 

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी विधानसभा निवडणुकीच्या  रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केला होता. निलेश राणे हे कुडाळ किंवा गुहागर विधानसभा मतदारसंघातून (guhagar vidhan sabha) निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यात निलेश राणे यांचे गुहागरमधील दौरे वाढले होते. त्यांची गुहागरमधील सभाही प्रचंड गाजली होती. तेव्हापासूनच निलेश राणे हे गुहागर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांचा विजय झाला होता. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरुन श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आपल्या मेहुण्याला रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम (Vipul Kadam) हे यंदा गुहागरमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. विपुल कदम हे खेडमधील तळे गावचे रहिवासी आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गुहागरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत गुहागर विधानसभेसाठी विपुल कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. पितृपक्ष संपल्यानंतर शिंदे गटाकडून विपुल कदम यांच्या नावाची घोषणा होईल, असे सांगितले जाते. तसे घडल्यास निलेश राणे यांचे गुहागरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे राणे कुटुंबीय आणि भाजप पक्षाकडून विपुल कदम यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहावे लागेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram