ABP News

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदशेमध्ये भाजपचा दणदणीत विजय, 42 जागांवर मारली बाजी

Continues below advertisement

इटानगर : अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh Election Result) आणि सिक्कीम विधानसभा (Sikkim Assembly Election Result) निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरु आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) एकहाती सत्ता मिळवली आहे. सिक्कीम विधानसभा निवडणुकीत सिक्कीम क्रांतिकारी मोर्चानं (SKM) सलग दुसऱ्यांदा विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरु ठेवली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. बातमी लिहून प्रसिद्धकरेपर्यंत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार भाजपनं 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे. 

अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत.आतापर्यंत एकूण 50 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपनं त्यामध्ये 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर, ते अजून  5 जागांवर आघाडीवर आहेत. याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीनं 4 जागांवर विजय मिळवला असून ते 1 जागेवर आघाडीवर आहेत. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं 2 जागांवर विजय मिळवला आहे. 

अजित पवारांच्या नेतृ्त्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणाचल प्रदेशात खातं उघडलं आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नसला तरी ते एका जागेवरुन  आघाडीवर आहेत. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे तर दोन ठिकाणी ते आघाडीवर आहेत.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram