देशमुखांनी Sachin Waze ताब्यात आल्याचा मुहूर्त साधला? संपत्तीवर टाच येण्याच्या भीतीनं ईडीसमोर?
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. आज मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.