Sam Pitroda : ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत
Sam Pitroda : ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत
ज्येष्ठ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आपल्या विधानांमुळे अनेकदा त्यांच्याच पक्षाला अडचणीत आणलंय. त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा आला. अमेरिकेत आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला, तर मुलांना १०० टक्के संपत्ती वारसाहक्कात मिळत नाही, कारण संपत्तीचा ५५ टक्के भाग सरकार कर म्हणून घेतं, मला हा कायदा योग्य वाटतो, पण भारतात तसं काहीच नाहीये.. यावर चर्चा झाली पाहिजे.. कारण संपत्तीचं पुनर्वाटप करायचं असेल तर लोकहितार्थ नवे कायदे करावे लागतील असं पित्रोदा म्हणाले. यावरून भाजपनं काँग्रेसवर सडकून टीका केलीय.