BJP's Warning: 'तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे', स्थानिक निवडणुकीपूर्वी मंत्र्यांना पक्षश्रेष्ठींचा इशारा

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. 'पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे', असा स्पष्ट इशारा भाजप मंत्र्यांना देण्यात आला आहे. या बैठकीत मंत्र्यांना पालकमंत्रिपद असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सक्रिय होण्यास सांगण्यात आले असून, पक्षांतर्गत मतभेद मिटवून निवडणुकीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांची कामं करण्यावर भर देण्याच्या स्पष्ट सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola