Sujay Vikhe On Mahayuti: 'मविआ म्हणजे फुसके बार' सुजय विखेंची राजकीय फटकेबाजी

Continues below advertisement
नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे-पाटील यांनी दिवाळीच्या फटाक्यांची उपमा देत राजकीय विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. या राजकीय आतषबाजीत त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना फटाक्यांच्या उपमा दिल्या. 'काम फक्त टिकल्या फोडायचं, आता पवार साहेब जे आहेत ते महाराष्ट्रात टिकल्या फोडायचं काम करतायत,' असा थेट टोला त्यांनी शरद पवार गटाला लगावला आहे. महायुतीला 'ट्रिपल बार' संबोधताना, महाविकास आघाडीला 'फुसके बार' आणि 'अँग्री बर्ड' पार्टीपॉप म्हटले, जे जमिनीवर आदळल्यावर वाजत नाहीत. उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना त्यांनी 'नाग गोळी' म्हटले, ज्यातून फक्त काळा धूर निघतो, तर संजय राऊत यांची तुलना 'भोई चक्रा'शी केली जे एकाच जागी फिरते. अजित पवारांना '१२० शॉट' तर एकनाथ शिंदेंना 'मोरपिसारा' फटाक्याची उपमा दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola