Voter Scam : दुबार मतदारांवरून भाजप आक्रमक, ठाकरे-गायकवाडांवर गंभीर आरोप
Continues below advertisement
भाजप नेते प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी विशेषतः मुस्लिम दुबार मतदारांमुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा दावा केला, ज्यात बीडमधील पंकजा मुंडे आणि मुंबईतील मिहिर कोटेचा यांचा समावेश आहे. 'तुमची भूमिका मराठी, हिंदू आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे आणि मुस्लिम, अल्पसंख्याक दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची तुमची भूमिका संशयास्पद आहे,' असं म्हणत प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. त्यांनी धुळे, बीड, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई नॉर्थ ईस्ट आणि अमरावतीमधील पराभवाचे आकडे सादर करत तिथल्या मुस्लिम दुबार मतदारांची संख्या सांगितली. मुंबई नॉर्थ सेंट्रलमध्ये १६,५१४ मतांनी विजयी झालेल्या वर्षा गायकवाड ५९,८०५ दुबार मतदार असलेल्या मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही लाड यांनी केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement