Principal On Child Challenged Video: गतिमंद विद्यार्थ्याला मारहाणीचे व्हिडिओ होती मग कारवाई नाही? मुख्याध्यापक म्हणाले
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालयात एका दिव्यांग विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शाळेतील कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे वर्णन करताना मुख्याध्यापक म्हणाले, 'तिने मुलाला पोटात मारणं, पाठीत मारणं... छातीवर पाय ठेवून बसणं, अशी मारहाण केलेली आहे'. तक्रारदार प्रतिन घंगाळे यांनी हा प्रकार उघडकीस आणत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, या घटनेचे २०१८ पासूनचे व्हिडिओ समोर आले असून, केवळ एकच नाही तर अनेक विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे क्रूर वागणूक दिली जात असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आता चिकलठाणा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement