BMC Elections: भाजपचं 'मिशन 150', शिंदे गटाला 65-75 जागा? सूत्रांच्या हवाल्याने मोठी बातमी

Continues below advertisement
मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकीसाठी भाजपने (BJP) जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता मिळवल्यानंतर आता मुंबई महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने 'मिशन 150' जागांचे लक्ष्य ठेवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १५० जागांवर उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असून शिंदे गटाला (Shinde Group) केवळ ६५ ते ७५ जागा देण्यास अनुकूल आहे. महाविकास आघाडीचे (MVA) प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये मतांची विभागणी झाल्यास त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यासोबतच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांवरही निवडणुकीची पुढील गणितं अवलंबून असतील, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola