Bawankule on Thackeray : महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सगळ्यांना माहितीये- बावनकुळेंचा टोला

Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'राहुल गांधींच्या शिकवणीवर चालणारेच खरे पप्पू आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सगळ्यांना माहिती आहे,' असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वापरलेली यादीच विधानसभेला वापरली गेल्याचा दावा करत, फेक नॅरेटिव्हला आता लोक बळी पडणार नाहीत, असेही ते म्हणाले. पक्ष आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. महायुतीलाच ५१ टक्के मतं मिळतील, असा सर्वे स्वतः उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवारांनी केला असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola