War of Words: '...तुम्ही आयत्या बिळावरचे नागोबा', Ashish Shelar यांचा Uddhav Thackeray यांच्यावर थेट हल्ला!

Continues below advertisement
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शेलार यांनी ठाकरे यांच्यावर मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्यातील सत्ता दुसऱ्यांच्या जीवावर मिळवल्याचा घणाघाती आरोप केला. 'उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं?' असा थेट सवाल शेलार यांनी केला. आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता मिळवली, राज्यात आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आणि नंतर काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवले, हे सर्व म्हणजे आयत्या बिळावर नागोबा बसण्यासारखे आहे, असे शेलार म्हणाले. तसेच, ठाकरे यांची भाषा महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी असल्याची टीकाही त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेतील खड्डे, रस्ते आणि नालेसफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून पैसे मिळवल्याचा आरोप करत शेलार यांनी 'चोर मचाए शोर' असा टोलाही लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola