Pravin Darekar VSI Probe: 'संस्थेची चौकशी गैर काय?', दरेकरांचा सवाल, शरद पवारांना राजकीय धक्का?
Continues below advertisement
भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI) चौकशीच्या आदेशांचे समर्थन केले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'ही एक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये लगेच राजकारण आणाईची आवश्यकता नाही,' असे स्पष्ट मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. शासनाने अनुदान दिलेल्या कोणत्याही संस्थेच्या निधीचा विनियोग तपासण्याचा अधिकार सरकारला आहे, असे ते म्हणाले. काही संस्था सरकारी सवलती घेऊन क्लब हाऊसप्रमाणे करोडोंचे शुल्क आकारतात, याचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही, असा आरोपही त्यांनी केला. शरद पवार (Sharad Pawar) संस्थेचे अध्यक्ष असल्याने किंवा रिलीफ फंडाला नकार दिल्यामुळे ही चौकशी होत असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आणि विरोधक प्रत्येक गोष्टीचे राजकारण करत असल्याची टीका केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement