Ashish Shelar Voter List Scam: महायुतीचा गंभीर आरोप, लोकसभेत मतचोरी झाली?
Continues below advertisement
भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर आणि थेट उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारयादीतील घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. 'लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केलीत, वोट चोरी केलीत', असा थेट आरोप शेलार यांनी केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांमध्ये केवळ दोन लाखांपेक्षा थोडं जास्त अंतर होतं. मात्र, केवळ ३१ मतदारसंघांतच सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त दुबार अल्पसंख्याक मतदार आढळल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. संपूर्ण २८८ विधानसभा मतदारसंघांत हा आकडा जवळजवळ १६ लाख ८४ हजार असू शकतो, असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. हा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement