ST Bus Profit: एसटी महामंडळाची दिवाळीत रेकॉर्डब्रेक कमाई, १० दिवसांत कमावले ३०१ कोटी रुपये
Continues below advertisement
दिवाळीच्या काळात राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या विशेष नियोजनामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. १८ ते २७ ऑक्टोबर या १० दिवसांच्या कालावधीत एसटीने तब्बल ३०१ कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे, २७ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी ३९.७५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून महामंडळाने या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यंदा ३७ कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळाले आहे. पुणे विभागाने २०.४७ कोटी रुपयांसह सर्वाधिक कमाई केली, तर त्याखालोखाल धुळे आणि नाशिक विभागांचा क्रमांक लागतो. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामगिरीबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement