Vande Mataram Row: 'मुंबईच्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल', अबू आझमींना भाजपचा थेट इशारा

Continues below advertisement
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुरु असलेल्या वादात, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिल्याने भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एका भाजप कार्यकर्त्याने इशारा दिला, 'आज तो अबू आझमी जी, आप पुलिस के प्रोटेक्शन में घर में जाकर छुप गए। कभी वह मौका आएगा कि आपका बंबई की सड़कों पर चलना मुश्किल हो जाएगा'. आझमी यांच्या मुंबईतील घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. 'भारतात राहायचं असेल, तर वंदे मातरम् म्हणावंच लागेल' असं म्हणत कार्यकर्त्यांनी सामूहिक वंदे मातरम् गायन केलं. या घटनेमुळे कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आझमी यांनी आपल्या धार्मिक श्रद्धेमुळे आपण हे गीत गाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola