Maharashtra BJP Operation Lotus : तावडे समितीचा नकारात्मक अहवाल, भाजपचं ऑपरेशन लोटस 2.0?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस-टू राबवणार असल्याची माहिती मिळतेय... २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विनोद तावडेंच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती... या समितीचा अहवाल भाजप बाबत नकारात्मक आहे... त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस टू राबवण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय... ऑपरेशन लोटस-टूमध्ये राष्ट्रवादी सोबत काँग्रेसचे काही नेत्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे.... २०२४ मध्ये भाजपचं लोकसभेचं बळ महाराष्ट्रातून घटणार आहे... ही भाजपसाठी नक्कीच चिंता वाढवणारी बाब आहे... म्हणूनच ऑपरेशन लोटस-टू राबवून त्यांचे ते आपलं करण्याचं धोरण भाजप राबवणार आहे.... एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तावडे समितीने केंद्रीय नेतृत्वाला अहवाल दिल्यानंतर भाजप एकदम अॅक्शन मोडमध्ये गेलाय..