Shiv Jayanti 2021 | शिवजयंतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; भाजपकडून टीका
मुंबई : दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवसी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि दिल्लीपर्यंत मराठ्यांच्या साहसगाथा ज्यांच्या पराक्रमांतून पोहोचल्या, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते.
महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर (Shivjayanti 2021) कोरोना विषाणूच्या ससंसर्गाचं सावट असणार आहे. मागील काही दिवसांत कोरोनाची दहशत काहीशी कमी झाली होती, याच पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी पुन्हा खुल्या झाल्यामुळे शिवप्रेमींनी याही वर्षीचा शिवजयंती उत्सवाचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं.
किंबहुना अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे, काही ठिकाणी नाटक- व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. पण, बुधवारी राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत.