Maha Governor vs CM| विमान उड्डणाला मान्यता नसल्याचा संदेश आदल्याच दिवशी दिला : मुख्यमंत्री कार्यालय

Continues below advertisement
मुंबई : सरकारी विमानातून प्रवास करण्यावरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाला नवं तोंड फुटलं. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं, असं राज्यपाल सचिवालयाने म्हटलं आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाने आपली बाजू मांडली आहे. राज्यपालांना विमान वापरण्यात परवानगी मिळाली आहे की नाही याची खातरजमा न केल्यानेच राज्यपालांचा खोळंबा झाला. यात राज्य सरकारची कोणतीही चूक नाही, असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.  या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने परिपत्रक जारी केलं आहे.मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत मान्यता दिली नसल्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र राजभवनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यतेविषयी कुठलीही खात्री करुन न घेतल्याने राज्यपालांना सरकारी विमानाने इच्छित स्थळी जाता आलं नाही. राजभवन सचिवालयाने राज्यपालांबाबत पुरेशी काळजी घेणं अपेक्षित होतं. पण ते झालं नाही. राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राजभवानातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असंही या पत्रकात म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram