Amit Satam : 'मतचोरी की वोट चोरी?' भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा महाविकास आघाडी आणि मनसेला थेट सवाल

Continues below advertisement
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 'मतचोरी की वोट चोरी?' असा थेट सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी विशेषतः धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघांचा उल्लेख करत महाविकास आघाडी आणि मनसेवर निशाणा साधला आहे. साटम यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र येत मतदारयाद्यांमधील घोळाविरोधात 'सत्याचा मोर्चा' काढला होता, ज्याला उत्तर म्हणून भाजपने हे आरोप केल्याचे दिसून येत आहे. या आरोपांमुळे आता आगामी काळात आरोप-प्रत्यारोपांची एक नवी मालिका सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola