World Champions: 'दोन महिने Social Media पाहिला नाही', Coach Amol Muzumdar यांचा World Cup विजयानंतर खुलासा
Continues below advertisement
भारतीय महिला क्रिकेट संघाचे (Indian Women's Cricket Team) प्रशिक्षक अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) यांचं विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. 'दोन नोव्हेंबर हा दिवस माझ्या आयुष्यामधला सर्वात महत्त्वाचा दिवस असेल असं मी आज तरी म्हणू शकतो,' अशी भावना मुझुमदार यांनी व्यक्त केली. दोन वर्षांच्या मेहनतीचं फळ मिळाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. सेमीफायनलमध्ये (Semi-Final) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) लिहिलेलं 'One More Run' हे वाक्य कुठून आलं असं विचारल्यावर ते हृदयातून आल्याचं त्यांनी सांगितलं. गेले दोन महिने सोशल मीडियापासून (Social Media) पूर्णपणे दूर राहिल्याचा खुलासाही त्यांनी केला. ही वर्ल्ड कप (World Cup) जिंकण्याची केवळ सुरुवात असून, या विजयातून नवी पिढी प्रेरणा घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement