New Delhi: भाजप खासदार राष्ट्रपतींना भेटायला तर गेले, निवेदनावर सही करायला मात्र टाळाटाळ : ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी देखील होते. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असे उद्गार राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली. "मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयी अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या", असं राष्ट्रपती म्हणाले आहेत. मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांची खासदार छत्रपती संभाजीराजे व महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ खासदार वंदना चव्हाण, खासदार विनायक राऊत, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार संग्राम थोपटे यावेळी दिले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram