Aamir Khan : आमीर खानच्या जाहिरातवरुन संताप, भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचं CEAT कंपनीला पत्र
भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आमीर खानच्या या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. कंपनीने नमाजच्या नावाखाली रस्ते बंद करणे आणि अजानच्या वेळी मस्जीदमधून बाहेर पडणारा आवाजाशी संबंधित समस्यांचंही समाधान करायला हवं, असे हेगडे यांनी म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंना पत्र लिहून हेगडे यांनी हिंदू बांधवांमध्ये रोष निर्माण करणाऱ्या जाहिरातींकडे आपण लक्ष द्यावं, असे पत्रातून सूचवले आहे.