Jalna : राज्य सरकारवर टीका करताना भाजप आमदार नारायण कुचे यांची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले कुचे...
जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची नावे अनुदान यादीतून वगळण्यात आल्याने भाजपकडून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात भाजप आमदार नारायण कुचे यांची जीभ घसरली आम्ही छत्रपतीचे खरे पाईक असून सत्ताधार्यांनी छत्रपतींच्या नावाने मत मागितली मात्र ते जर शेतकऱ्यांवर अन्याय करत असतील तर हे सरकार छत्रपतींची नाही तर पाकिस्तानची औलाद असल्याचे वक्तव्य त्यांनी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पोलिसांनी रस्त्यातच हा मोर्चा आडवल्या नंतर भाषण करताना आमदार नारायण कुचे यांनी आपल्या भाषणा दरम्यान ही टीका केली आहे.
Tags :
Jalna Narayan Kuche Farmer Issue Maharashtra Narayan Kuche On Maharashtra Government Jalna Narayan Kuche