Parbhani : भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा नवाब मालिकांना इशारा, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
ऐन रब्बी पेरणीच्या काळात महावितरण कडून तोडण्यात आलेली विज कनेक्शन पुर्ववत करून शेती पंपांची वीज तोडणी मोहीम थांबवण्याच्या मागणीसाठी परभणीतील महावितरण कार्यलयासमोर आज भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मोठ्या संख्येने शेतकरी संहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान बोलताना भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी थेट पालकमंत्री नवाब मलिक यांना लक्ष करत स्वतःच्या जावयासाठी वाट्टेल ते करताहेत मात्र पालक असलेल्या परभणी जिल्ह्याचा मात्र त्यांना विसर पडलाय त्यामुळे त्यांना आम्ही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिला.
Continues below advertisement