BJP Maratha Candidate : भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातून 16 उमेदवारांना तिकीट

BJP Maratha Candidate  : भाजपच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातून 16 उमेदवारांना तिकीट
मराठवाड्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने मराठवाड्यातून सर्वाधिक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. मराठवाड्यात भाजपने 16 उमेदवार यांची यादी जाहीर केली .यात तीन मतदारसंघ राखीव आहेत. 13 खुल्या मतदारसंघातुन मराठवाडयात दहा मराठा समाजाचे उमेदवार दिले आहेत . औरंगाबाद पूर्व मतदार संघातून अतुल सावे आणि तुषार राठोड हे दोन ओबीसी चेहरे दिले आहे. तर प्रशांत बंब जैन समाजाच्या चेहरा गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीत उतरवला आहे..  मराठा समाजाला कोणत्या मतदारसंघातून प्रतिनिधित्व दिले यावर एक नजर टाकूया.  फुलंब्री विधानसभा अनुराधा चव्हाण   भोकरदन -जाफ्राबाद विधानसभा  संतोष दानवे   परतूर-मंठा विधानसभा  बबनराव लोणीकर   औसा विधानसभा  अभिमन्यू पवार   निलंगा विधानसभा  संभाजी पाटील निलंगेकर   तुळजापूर विधानसभा  राणाजगजितसिंह पाटील   हिंगोली विधानसभा तान्हाजी मुटकुळे   जिंतूर विधानसभा मेघना बोर्डीकर  नायगाव विधानसभा राजेश पवार  भोकर  श्रीजया चव्हाण  ......   ओबीसी   औरंगाबाद पूर्व अतुल सावे  मुखेड तुषार राठोड   गंगापूर प्रशांत बंब  .....  राखीव   बदनापूर नारायण कुचे  केज विमल मुंदडा  किनवट भीमराव केराम

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola