BJP Mission 45 : भाजपच्या 'मिशन 45' दुसऱ्या टप्प्यात, बड्या नेत्यांची पार पडली बैठक
abp majha web team
Updated at:
03 Nov 2022 03:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपच्या मिशन ४५ अंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यासाठी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात या बैठकीचा आयोजन करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख 16 मतदारसंघात प्रवास केला होता. आता दुसऱ्या टप्प्याचा नियोजन करण्यासाठी बैठकीचा आयोजन करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून 45 जागा जिंकून येणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली आहे आता दुसऱ्या टप्प्यात बूथ स्तरावर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे आणि मतदारसंघातील समस्या जाणून घेऊन तिथे संघटना मजूर करणे यासाठी भाजप प्रयत्न करत आहेत.