ST Strike : भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची एसटी संपातून तूर्तास माघार
Continues below advertisement
वेतनवाढीच्या निर्णयानंतरही एसटी कर्मचारी संपाचा तिढा आणखी वाढलाय. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व करणारे भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी तूर्तास माघार घेतलीय. तर दुसरीकडे एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर संपकरी ठाम आहेत. त्यांनी राज्यभरात संप सुरुच ठेवला आहे. दरम्यान, एसटी प्रशासनानं कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दोन दिवसांत कामावर रुजू व्हा अन्यथा बडतर्फीची कारवाई करू असा अल्टिमेटम एसटी प्रशासनानं कामगारांना दिलाय असं कळतंय. तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल सुरु आहे.
Continues below advertisement