Rohit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव; आमदार रोहित पवार यांचा दावा
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी (NCP) फोडण्याचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. पवार कुटुंबात (Pawar Family) फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारेच पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केले आहेत. शिवसेनेनंतर आम्हालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, असं सांगताना रोहित पवारांनी आमच्या कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं.