BJP Mumbai : मनपा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भाजपची बैठक, मराठी-गुजराती मतं वळवण्यासाठी रणनिती
भाजपच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची आज दादरमधील वसंत स्मृती येथे बैठक पार पडणार आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होईल. मुंबईतील प्रमुख आमदार, नेते आणि सहाही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील मराठी, हिंदी आणि गुजराती मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती या बैठकीत आखण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेनंतर भाजप सध्या अलर्ट मोडवर आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यास प्रत्येक वॉर्डात काय परिस्थिती असेल, याचा आढावा या बैठकीत घेतला जाईल असे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारीला सुरुवात झाली आहे. सणांच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या बैठकांच्या माध्यमातून रणनीती ठरवून केला जाईल.