Bishnoi Gang Special Report : सलमानच्या 'जानी दुश्मन'चे शत्रू कोण?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBishnoi Gang Special Report : सलमानच्या 'जानी दुश्मन'चे शत्रू कोण?
हेही वाचा :
जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून मुलाच्या निधनानंतर 10 दिवसांतच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचा ह्रदयद्रावक प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात नजीक असलेल्या वाडेकर गल्लीत पती-पत्नीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली असून 8 दिवसांपूर्वीच पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या त्यांच्या मुलाने देखील जीवन संपवलं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांच्या 16 वर्षीय मुलानेही आत्महत्या केली होती, त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी अशाप्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर मुलाच्या दहाव होण्यापूर्वीच वडिल गणेश मच्छिंद्र वाडेकर आणि आई गौरी गणेश वाडेकर यांनी आपली जिवनयात्रा संपवलीय. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून वाडेकर कुटुबीयांबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटल येथे पाठवले आहेत.