Navi Mumbai garbage : जैववैद्यकीय कचरा रस्त्यावर फेकला जातोय, नागरिकांच्या जीवाला धोका
Continues below advertisement
नवी मुंबईतील (Navi Mumbai) चिबूर परिसरात 'लिव वेल मेडिकल' (Liv Well Medical) या खाजगी वैद्यकीय संस्थेकडून जैववैद्यकीय कचरा (Biomedical Waste) रस्त्यावर उघड्यावर टाकल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाकडून कडक कारवाई होत नसल्यानेच अशा प्रकारे जैववैद्यकीय कचरा खुलेआम टाकला जात असल्याचे समोर आले आहे. या कचऱ्यामध्ये इंजेक्शनच्या सुया, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, वापरलेले मास्क आणि ग्लोव्हज यांचा समावेश असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांनुसार, अशा घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे, परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement