Akola : अकोल्यात बायोडिझेलच्या अवैध साठ्यावर पोलिसांची धडक, 55 हजार लिटर्सचे दोन टँकर जप्त

Continues below advertisement

अकोल्यात बायोडिझेलच्या अवैध साठ्यावर पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई केलीये. यात 55 हजार लिटर्स बायोडिझेलचे दोन टँकर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेयेत. यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोनजण फरार आहेय. अकोला शहरालगतच्या येवता शिवारातील राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजय तापडिया यांच्या शेतात हा गोरखधंदा सुरू होताय. हे रॅकेट चालविणारा अजय तापडियांचा मुलगा प्रसन्न आणि त्याचा सहकारी अभय राठी फरार झालाय. या कारवाईत पोलिसांकडून 55 हजार लिटर्स बायोडिझेल, दोन टँकर्ससह 1 कोटी 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अकोल्यातील कारवाईमूळे राज्यात बायोडिझेलचा काळाबाजार करणारं एक मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram