Bijmata Rahibai Popere यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलं : ABP Majha
Continues below advertisement
पद्मश्री किताबाने सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात जोरदार आंदोलन सुरू केलंय... त्यांनी त्यांच्या कोंभाळणे गावात सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीच्या दुकानांवर गावातील महिलांसह हल्ला करत चार दुकाने बंद पाडलीय.. शिवाय दारूच्या बाटल्या फोडत प्रशासनाचा निषेधदेखील केलाय... अनेकदा तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने राहीबाईंसह गावातील महिलांनी थेट दारूच्या दुकानांवर धाव घेतली... एवढंच नाही तर पोलीस कारवाई करत नसतील तर महिला दारूविरोधात उभ्या ठाकणार असल्याचा निर्धार बोलून दाखवलाय...
Continues below advertisement