Election War : 'सत्तेचा गैरवापर होतोय', पवारांच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; 'Bihar मध्ये NDA च सरकार बनणार'

Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचारात उडी घेतली आहे, तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्तेच्या गैरवापरावरुन टीका केली आहे. 'सगळे सरकारही नाराज आहेत कारण सत्तेचा गैरवापर होतोय,' असं म्हणत शरद पवारांनी बिहारमधील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बेगूसरायमध्ये (Begusarai) भाजप उमेदवार कुंदन कुमार (Kundan Kumar) यांच्या प्रचारासाठी फडणवीसांनी रोड शो केला. यावेळी त्यांनी 'प्रधानमंत्री मोदी जी और नीतीश जी के नेतृत्व में फिर एक बार बिहार एनडीए के साथ आ रहा है,' असा विश्वास व्यक्त करत एनडीएच्या विजयाचा दावा केला. मोदी, नितीश, पासवान, मांझी आणि कुशवाहा या पाच नेत्यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बनेल, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola