Tejas MK 1A Rajnath Singh : तेजस एमके-1 ए वायुसेनेत दाखल, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार
Continues below advertisement
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत नाशिक (Nashik) येथे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान तेजस एमके-१ए (Tejas MK-1A) भारतीय वायुसेनेमध्ये दाखल झाले आहे. 'आत्मनिर्भर भारताचा संदेश देणारे' हे अत्याधुनिक विमान वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाल्याने भारताच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) नाशिक येथील उत्पादन केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. तेजस एमके-१ए हे प्रगत एव्हियोनिक्स, आधुनिक रडार प्रणाली, सुधारित शस्त्र क्षमता आणि अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सुसज्ज आहे. हे विमान निवृत्त झालेल्या मिग-२१ (MiG-21) विमानांची जागा घेणार आहे. या सोहळ्यामुळे भारताच्या 'मेक इन इंडिया' आणि आत्मनिर्भर संरक्षण उत्पादन क्षमतेला मोठी चालना मिळाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement