Bihar Politics: जागावाटपावर शिक्कामोर्तब? Amit Shah, Vinod Tawde यांच्यासोबत JDU नेत्यांची खलबतं

Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आणि संयुक्त जनता दल (JDU) यांच्यात जागावाटपावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात आज दिल्लीत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यासोबत जेडीयू नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'शंभर दोन जागांवरती जदयू आणि शंभर एक जागेवरती भाजप लढणार आहे'. एकूण २४३ जागांपैकी २०३ जागांवर भाजप-जेडीयूमध्ये सहमती झाली असून, उर्वरित ४० जागा एनडीएच्या (NDA) इतर मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचे समजते. जागावाटपाच्या या नव्या समीकरणामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, अंतिम घोषणा लवकरच अपेक्षित आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola