Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांचा BJP मध्ये प्रवेश

Continues below advertisement
कल्याण-डोंबिवलीतील (Kalyan-Dombivli) राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला हा जोरदार धक्का मानला जातोय. म्हात्रे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला. दिपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे (Pundalik Mhatre) हे माजी महापौर होते आणि म्हात्रे स्वतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी दोन वेळा स्थायी समिती सभापतीपदही भूषवले आहे. विशेष म्हणजे, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, गेल्या वर्षीच त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता त्यांचा भाजप प्रवेश हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी (KDMC Elections) एक मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola