Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना दिलासा, तूर्तास राजीनामा न घेण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय

Continues below advertisement
बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेणू शर्मा नावाच्या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. परंतु ही महिलाच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचं कळतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram