Aadani Investment : नकारात्मक वातावरणात अदानीमध्ये अमेरिकन फर्मकडून मोठी गुंतवणूक

भाजप, केंद्र सरकार पर्यायाने पंतप्रधान मोदींवर आरोप करताना उद्योगपती अदानींचं नाव विरोधकांकडून सातत्याने घेतलं जातं. काही दिवसांपुर्वी हिंडनबर्ग संस्थेचा रिपोर्ट आला आणि अदानींच्या साम्राज्याला मोठा हादरा बसला. अदानी समुहाबद्दल या रिपोर्टमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठी पडझड सुरु झाली. अदानींचे शेअर्स सातत्याने तळ गाठत होते. इतकच काय तर अदानी ग्रुपमध्ये एलआयसीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे एलआयसीच्या कारभारावरही सवाल उपस्थित केला जाऊ लागला. अदानींच्या समभागातील घसरणीमुळे एलआयसीच्या समभागांची किंमतही कोसळायला सुरुवात झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola