Bhandara जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट; गायी, म्हशींना तोंडखुरी आणि पायखुरी आजाराची लागण
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं ठाकलं आहे. भंडारा जिल्ह्यातील गायी, म्हशींना तोडखुरी आणि पायखुरी आजाराची लागण झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के जनावरांना या रोगाची लागण झाली आहे.
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून येथील शेतकरी दूध उत्पादन देखील करतात मात्र आय याच दूध उत्पादक शेतऱ्यावर संकट ओढवले आहे. आदीच भंडारा जिल्ह्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया या आजाराने डोके वर काढले असताना आता जनावरांना तोंडखुरी, पायखुरी या आजाराने ग्रासले आहे. हा आजार संसर्गजण्य असल्याने आता पशू पालकांची चिंता वाढली आहे, या आजारांमुळे जिल्ह्यात 50% जनावरांना याची लागलं झाली असल्याची माहिती समोर येत आहे, तर भंडारा तालुक्यातील खंबाटा गावात तर 90% जनावरांना या आजाराची लागण झाली आहे, अनेक जनावरांचे मृत्यू देखील झाले असून त्यांच्या म्हसी दूध देत नसल्याने वासराचा पुतळा तयार करून पशू पालकांना दूध काढावे लागत आहे. या आजारावरील लसीकरण झाले असून सुद्धा पुन्हा डोके वर काढले असल्याने आता पशू पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी पशू पालक करीत आहेत.