Maharashtra Politics : Sunil Mane आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे. शरद पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. 'राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे आणि अजित दादा त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो,' असे म्हणत माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यासोबत शहाजी क्षीरसागर यांचाही आज रहिमतपूर येथील गांधी चौकात सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रवेश होणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करणारे सुनील माने यांनी पक्षफुटीनंतरही शरद पवारांनाच पाठिंबा दिला होता, मात्र आता त्यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षबदलामुळे कराड उत्तर आणि कोरेगावमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी महापालिका निवडणूक ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढवणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement