Eknath Khadse ED Inquiry : भोसरी घोटाळा : एकनाथ खडसेंच्या आठ तासांच्या ईडी चौकशीत काय घडलं?

Continues below advertisement

पुणे येथील भोसरी येथे खडसे यांनी 3 एकरचा एक भूखंड घेतला होता. मात्र हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा होता. त्यामुळे एमआयडीसीच्या भूखंडाची अश्यापद्धतीनं खरेदी करता येत नाही. आपल्या मंत्रीपदाचा गैर वापर करत खडसे यांनी हा भूखंड घेतला असा आरोप करण्यात आला होता. या भूखंडाची मुळ किंमत 31 कोटी रूपये असताना खडसे यांनी हा भूखंड केवळ 3.75 कोटी रूपयांना विकत घेतला. या व्यवहाराच्या चौकशीसाठी राज्य शासनाने नेमलेली समिती ही नावापुरती आहे. ही समिती केवळ भूखंड हस्तांतरणाची चौकशी करू शकते. मात्र हा व्यवहार नेमका कसा झाला याची चौकशी होणे आवश्यक आहे. तेव्हा या व्यवहाराची सीबीआय, केंद्रीय दक्षता आयोग व आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी करत तक्रारदारानं हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram