विधानसभेच्या तयारीसाठी मिनी विधानसभेतच पक्षबांधणी करण्याचे संकेत, शिवसेनेची पक्षबांधणीसाठी तयारी
Continues below advertisement
मुंबई : शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना जनसंपर्क वाढवण्यासाठी शिव संपर्क अभियान सुरु करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राज्यभरातील जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आदेश दिले आहेत.
Continues below advertisement