Bhima River Floods | चंद्रभागेत धोकादायक स्नान करणाऱ्या भाविकांची सुरक्षा धोक्यात
उजनी धरणातून पन्नास हजार क्युसेक आणि वीर धरणातून तीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. चंद्रभागेच्या पात्रात साठ हजार क्युसेक विसर्ग असून मंदिर पाण्याखाली जात आहे. घाटाच्या पायऱ्या बुडालेल्या असतानाही भाविक, लहान मुले आणि महिला धोकादायक स्नान करत आहेत. प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.