Drug Bust | MD ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बबनभाईला पोलीस ठाण्यात VIP सुविधा, भूमिकेवर प्रश्नचिन्ह
शाजापूर MD ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी बबनभाईने वाळूज MIDC पोलीस ठाण्यात कुटुंबासह मेजवानी केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दोन किलो MD ड्रग्ज जप्त करून तीन आरोपींना अटक केली होती. आरोपींना दिल्या जाणाऱ्या VIP ट्रीटमेंटमुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामागे राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.