Bhendwal Prediction : बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज जाहीर, कसा असणार पाऊस?
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 09:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संपूर्ण राज्यातील शेतकऱ्याचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील 'भेंडवळची घटमांडणी'चे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरुन राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराचं पीक पाण्याचे नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असतं. आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीतील वर्षभराचे घटात झालेल्या बदलावरुन वर्षभराचं नियोजन आणि अंदाज वर्तवण्यात आले. तर राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. तर हे अंदाज ऐकण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.