Bhaskar Bhagre Majha Katta : शिक्षकाने केंद्रीय मंत्र्यांना कसं हरवलं? भास्कर भगरे 'माझा कट्टा'वर

Continues below advertisement

लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं काम माझ्या सारख्या सर्वसामान्य मतदारांनी केल्यानं सर्वसामान्य शिक्षकाला इथंपर्यंत जाता आलं, असं भास्कर भगरे म्हणाले.  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावण्यात आली होती. प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला उमेदवारी द्यावी असा विचार मांडला गेला. तिथं माझ्या नावावर चर्चा झाली होती. पण, आर्थिक ताकद नसल्यानं निवडणूक कशी लढवू शकतो, असा प्रश्न मनात होता, असं भास्कर भगरे म्हणाले. लोकसभा लढवण्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्याचं माहिती होतं, असंही खासदार भगरे म्हणाले. पक्षात फूट पडल्यानंतर लोकं आमदारकीचे उमेदवार भास्कर भगरे असतील, असं म्हणायचे. नरहरी झिरवाळ यांच्या वेळी लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. तशीच निवडणूक यावेळी देखील लोकांनी हातात घेतल्याचं म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram