Bharat Jodo Yatra Maharashtra : असा असेल 'भारत जोडो' यात्रेचा तिसरा दिवस
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे.. सकाळी ६ पासून राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात झालीय.. गुलाबी थंडीत ही यात्रा नांदेडच्या शंकरनगरहून नायगावकडे रवाना झालीय... या यात्रेचा पहिला विसावा नायगाव लॉन्स इथं असेल.. त्यानंतर दुपारी चारनंतर आजच्या दिवसाचं दुसरं सत्र सुरु होईल. राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकही सहभागी होतायत... सकाळी यात्रा सुरु होताच राहुल गांधींना भेटण्यासाठी कोळी बांधव भारत जोडो यात्रेत सहभागी झाले... यावेळी त्यांनी आपल्या समस्या कोळी बांधवांना सांगितल्या.. तर काल बेरुळ घाटातून भारत जोडो यात्रा मार्गस्थ होत असताना शिवकालीन दृश्याने उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडलं... २० ते २५ तरुण शिवकालीन मावळ्यांचा पोशाख परिधान करुन घोड्यांवर स्वार झाल्याचं पाहायला मिळालं...